तिला मी काय म्हणू?

तिला मी काय म्हणू ? हेच कळत नाही.

कोणती उपमा द्यावी ? हाच प्रश्न छळत राही.

 

इंद्रधनुषी आकाश,

की आकाशातला चंद्र !

डोळ्यात  तिच्या,

चांदण्या त्या मंद्र !

छे! हे तर सारे जुनेच! नवे काहीच नाही.

तिला मी काय म्हणू ? हेच कळत नाही……..

 

उमलती कळी,

की टपोरा गुलाब !

गालावरची खाली,

पाहणारा बेताब !

छे! हे तर सारे जुनेच! नवे काहीच नाही.

तिला मी काय म्हणू ? हेच कळत नाही……..

 

सौंदर्याचा खजिना,

निसर्गाच देणं !

रूप तिचं,

नक्षत्रांच देणं !

छे! हे तर सारे जुनेच! नवे काहीच नाही.

तिला मी काय म्हणू ? हेच कळत नाही……

 

नकोच उपमा,

जुनाच तो कित्ता !

ती तर साक्षात,

जिवंत कविता !

हो, हे जरा वाटतंय नवं ! तरी रूपापुढे तिच्या काहीच नाही

तिला मी काय म्हणू ? हेच कळत नाही……..!!!!

मन्या आणि त्याचे प्रेम

                                                                                                  कॉलेजात आला शिकावयास मन्या,

तेथे त्यास दिसली एक अतिसुंदर कन्या.

rose petals

पाहताच तिजला मनात त्याच्या वाजली घंटा,

त्याने ऑफर केला तिजला गारेगार फंटा.

मग रोज करून गुळगुळीत दाढी,

उडवू लागला बापाची आयती गाडी.

अंगावर फवारून भरमसाठ अत्तर,

बिल मोबाईलचे उडवू लागला रोज सत्तर.

red-rose

बोलू लागला तिच्याशी रात्री घेऊन night pack,

 तिच्यासाठीच्या ग्रीटींग्सनी भरू लागली आता त्याची sack.

स्वप्नातही पाही तो तिजला राणी अन तो राजा,

वाटे त्याला कधी वाजेल आपला बेंड बाजा.

मित्र विचारत त्याला काय असे त्याचा फंडा?

पोरगी कशी मिळवली त्याने इतकी कंडा?

मित्र समवेत बसला असता एकदा ती आली,

अन त्याच्या स्वप्नांवर जणू मिसाईलच पडली.

तिने दिली लग्नपत्रिका तिची त्याच्या हाती,

भोवळ आली त्याला अन घाम त्याच्या माथी.

प्रेमाची ही अशी लक्तरेच होतात का हो सदा?

जाता जाता ती चक्क म्हणाली त्यास दादा.

अन प्रेमात ‘पडणं’ का म्हणतात हे त्याला समजलं,

जखम न दिसता ती कशी वाहते हे त्याला उमगलं.

  [‘प्रेमाचा गुलकंद’ वरून प्रेरणा घेऊन.]

बाप्पा

Image

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला,

दोन क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला.

उंदीर कुठे पार्क करू? lot नाही सापडला.

मी म्हटलं सोडून दे, आराम करू दे त्याला.

तू पण न देवा, कुठल्या जगात राहतोस?

मर्सिडीजच्या जमान्यात, उंदरावरून फिरतोस?

मर्सिडीज नाही निदान nano तरी घेऊन टाक.

तमाम देवमंडळी मध्ये भाव खाऊन तक.

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो.

भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो.

काय करू आता सारं manage होत नाही.

पुर्वीसारखी थोडक्यात मानसं खुशही होत नाहीत.

ईमिग्रेशनच्या रिक्वेस्टस नी सिस्टीम झालीये hang.

तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग.

चार आठ आणे,मोदक देऊन काय काय मागतात?

माझ्याकडच्या फाईल्स नुसत्या वाढतच जातात.

माझं ऐक तू, कर थोडं डेलिगेशन.

managementच्या थेअरीमध्ये, मिळेल सोल्युशन.

असं कर बाप्पा, एक laptop घेऊन टाक.

तुझ्या सर्व दूतांना, connectivity देऊन टाक.

म्हणजे बसल्याजागी काम होईल, धावपळ नको.

परत येऊन मला, दमतो म्हणायला नको.

माझ्या सर्व युक्त्यांनी, बाप्पा झाला खुश.

माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षीस.

सीईओ ची पोझिशन, town houseची ओवनरशिप.

ईमिग्रेशनही होईल लवकर, मग dual सिटीझनशिप.

मी हसलो उगाच, म्हटलं, देशील जे मला हवं.

म्हटला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?

“पारिजातकाच्या सड्यामध्ये उगवलेलं अंगण हवं”.

“सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवं”.

हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.

प्रत्येकाच्या मनाच्या कोन्यात थोडासा शिरकाव.

देशील आणून परत माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?

इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेण.

आई-बापाचं कधी न फिटणार देणं.

कर्कश वाटला तरी हवा ढोल-ताश्यांचा गजर.

भांडणारा असला तरी चालेल;पण हवा आहे शेजार.

यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान.

देशील कारे देवा माझ्या पदरात एवढं दान?

‘तथास्तु’ म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला.

सारं हाताबाहेर गेलय पोरा, ‘सुखी रहा’ म्हणाला !!!!!!!!!!!

                                                                                                                                                                                                            [संग्रहातून]

“पहिले……!’’

 तसं पाहिलं तर माणसाच्या आयुष्यात सर्वच गोष्टी कधी न कधी पहिल्यांदाच आलेल्या असतात.अशा पहिल्या गोष्टी शक्यतो माणूस विसरत नाही.भले मग त्या सुखांतिका असो वा दुखान्तिका! पहिल्या गोष्टींविषयी माणूस कधी कधी हळवाही असतो.माणसाला वर्तमानापेक्षा भूतकाळातच जगायला आवडत.कारण भूतकाळात नवीन काही घडवण्याची जबाबदारी त्याच्यावर नसते.या भूतकाळातील काही आठवणी या हृदयाला हुरहूर लावणाऱ्या असतात.शाळेतला पहिला दिवस[खरे तर हायस्कूल मधला,प्राथमिक शाळेतला पहिला दिवस कुणाला आठवेल?],शाळेतले पहिले मित्र,शाळेत केलेले पहिले भाषण,त्याचप्रमाणे शाळेतले पहिले भांडण,शाळेतल्या कोणत्यातरी कार्यक्रमात पहिल्यांदाच घेतलेला भाग,पहिल्यांदाच[आणि एकदाच] सर्वांसमोर [म्हणजे मुलींसमोर] घसरून पडलो तो क्षण,शाळेत मिळालेले पहिले बक्षीस.

त्यानंतर सुरु होतात फुलायचे दिवस,अर्थात त्या वेळी सर्वच गोष्टी आठवणीत राहणाऱ्या असतात.ते दिवस म्हणजे college चे दिवस.ह्या दिवसातल्या आठवणी फार विचित्र असतात.अनेक गोष्टी केल्याबद्दल तर कित्येक गोष्टी न केल्याबद्दल हुरहूर वाटत असते.रोजच्या जीवनातही खूप अशा पहिल्या गोष्टी असतात ज्या विसरता विसरत नाहीत,जसे पहिले प्रेम[व त्यानंतरचे प्रत्येक]हि एक अशीच गोष्ट आहे.परंतु आज इतक्या वर्षांनीही मला एक गोष्ट कळली नाही की प्रेमात नेहमी पडला किंवा बुडाला अशा प्रकारचे दुर्द्शादर्शक शब्दच का वापरतात?असो मुद्दा हा आहे कि पाहिलं प्रेम विसरता येत नाही.त्यानंतर लागलेली पहिली नौकरी,sorry job[नौकरी म्हटलं की आपण कुणाचेतरी नोकर असल्यासारखे वाटत]पहिली गाडी,पाहिलं घर,पहिला पाउस,पहिला पगार,इ.इ.इ.इ.इ…………!

Bright flower

तसाच हा माझा पहिला blog.काहीतरी सांगण्यासाठी,गप्पा मारण्यासाठी,बोलण्यासाठी…….मनातल मनासाठी !!!!!!!