तसं पाहिलं तर माणसाच्या आयुष्यात सर्वच गोष्टी कधी न कधी पहिल्यांदाच आलेल्या असतात.अशा पहिल्या गोष्टी शक्यतो माणूस विसरत नाही.भले मग त्या सुखांतिका असो वा दुखान्तिका! पहिल्या गोष्टींविषयी माणूस कधी कधी हळवाही असतो.माणसाला वर्तमानापेक्षा भूतकाळातच जगायला आवडत.कारण भूतकाळात नवीन काही घडवण्याची जबाबदारी त्याच्यावर नसते.या भूतकाळातील काही आठवणी या हृदयाला हुरहूर लावणाऱ्या असतात.शाळेतला पहिला दिवस[खरे तर हायस्कूल मधला,प्राथमिक शाळेतला पहिला दिवस कुणाला आठवेल?],शाळेतले पहिले मित्र,शाळेत केलेले पहिले भाषण,त्याचप्रमाणे शाळेतले पहिले भांडण,शाळेतल्या कोणत्यातरी कार्यक्रमात पहिल्यांदाच घेतलेला भाग,पहिल्यांदाच[आणि एकदाच] सर्वांसमोर [म्हणजे मुलींसमोर] घसरून पडलो तो क्षण,शाळेत मिळालेले पहिले बक्षीस.
त्यानंतर सुरु होतात फुलायचे दिवस,अर्थात त्या वेळी सर्वच गोष्टी आठवणीत राहणाऱ्या असतात.ते दिवस म्हणजे college चे दिवस.ह्या दिवसातल्या आठवणी फार विचित्र असतात.अनेक गोष्टी केल्याबद्दल तर कित्येक गोष्टी न केल्याबद्दल हुरहूर वाटत असते.रोजच्या जीवनातही खूप अशा पहिल्या गोष्टी असतात ज्या विसरता विसरत नाहीत,जसे पहिले प्रेम[व त्यानंतरचे प्रत्येक]हि एक अशीच गोष्ट आहे.परंतु आज इतक्या वर्षांनीही मला एक गोष्ट कळली नाही की प्रेमात नेहमी पडला किंवा बुडाला अशा प्रकारचे दुर्द्शादर्शक शब्दच का वापरतात?असो मुद्दा हा आहे कि पाहिलं प्रेम विसरता येत नाही.त्यानंतर लागलेली पहिली नौकरी,sorry job[नौकरी म्हटलं की आपण कुणाचेतरी नोकर असल्यासारखे वाटत]पहिली गाडी,पाहिलं घर,पहिला पाउस,पहिला पगार,इ.इ.इ.इ.इ…………!
तसाच हा माझा पहिला blog.काहीतरी सांगण्यासाठी,गप्पा मारण्यासाठी,बोलण्यासाठी…….मनातल मनासाठी !!!!!!!
Pahila blog l like very much.
ॐ
आपला पहिला ब्लॉग खरचं वाचण्या सारखा पाटण्या आहे.
चांगला आहे.भरपूर ब्लॉग लिखान करा .शुभेच्छा !
धन्यवाद! आपल्यासारख्यांच्या शुभेच्छा मिळाल्या की उत्साह वाढतो.