परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला,
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला.
उंदीर कुठे पार्क करू? lot नाही सापडला.
मी म्हटलं सोडून दे, आराम करू दे त्याला.
तू पण न देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात, उंदरावरून फिरतोस?
मर्सिडीज नाही निदान nano तरी घेऊन टाक.
तमाम देवमंडळी मध्ये भाव खाऊन तक.
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो.
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो.
काय करू आता सारं manage होत नाही.
पुर्वीसारखी थोडक्यात मानसं खुशही होत नाहीत.
ईमिग्रेशनच्या रिक्वेस्टस नी सिस्टीम झालीये hang.
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग.
चार आठ आणे,मोदक देऊन काय काय मागतात?
माझ्याकडच्या फाईल्स नुसत्या वाढतच जातात.
माझं ऐक तू, कर थोडं डेलिगेशन.
managementच्या थेअरीमध्ये, मिळेल सोल्युशन.
असं कर बाप्पा, एक laptop घेऊन टाक.
तुझ्या सर्व दूतांना, connectivity देऊन टाक.
म्हणजे बसल्याजागी काम होईल, धावपळ नको.
परत येऊन मला, दमतो म्हणायला नको.
माझ्या सर्व युक्त्यांनी, बाप्पा झाला खुश.
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षीस.
सीईओ ची पोझिशन, town houseची ओवनरशिप.
ईमिग्रेशनही होईल लवकर, मग dual सिटीझनशिप.
मी हसलो उगाच, म्हटलं, देशील जे मला हवं.
म्हटला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?
“पारिजातकाच्या सड्यामध्ये उगवलेलं अंगण हवं”.
“सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवं”.
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.
प्रत्येकाच्या मनाच्या कोन्यात थोडासा शिरकाव.
देशील आणून परत माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?
इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेण.
आई-बापाचं कधी न फिटणार देणं.
कर्कश वाटला तरी हवा ढोल-ताश्यांचा गजर.
भांडणारा असला तरी चालेल;पण हवा आहे शेजार.
यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान.
देशील कारे देवा माझ्या पदरात एवढं दान?
‘तथास्तु’ म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला.
सारं हाताबाहेर गेलय पोरा, ‘सुखी रहा’ म्हणाला !!!!!!!!!!!
[संग्रहातून]
Aai shappth parya asle bhari kavita 2 lilies…Waaaa great yarrr mala tr vishesh basena bt keep it up mastttttttt …lay bhari kavita..zakassss ….klisht kaich nai sahaj Sopa bhagay …mastchh