मन्या आणि त्याचे प्रेम

                                                                                                  कॉलेजात आला शिकावयास मन्या,

तेथे त्यास दिसली एक अतिसुंदर कन्या.

rose petals

पाहताच तिजला मनात त्याच्या वाजली घंटा,

त्याने ऑफर केला तिजला गारेगार फंटा.

मग रोज करून गुळगुळीत दाढी,

उडवू लागला बापाची आयती गाडी.

अंगावर फवारून भरमसाठ अत्तर,

बिल मोबाईलचे उडवू लागला रोज सत्तर.

red-rose

बोलू लागला तिच्याशी रात्री घेऊन night pack,

 तिच्यासाठीच्या ग्रीटींग्सनी भरू लागली आता त्याची sack.

स्वप्नातही पाही तो तिजला राणी अन तो राजा,

वाटे त्याला कधी वाजेल आपला बेंड बाजा.

मित्र विचारत त्याला काय असे त्याचा फंडा?

पोरगी कशी मिळवली त्याने इतकी कंडा?

मित्र समवेत बसला असता एकदा ती आली,

अन त्याच्या स्वप्नांवर जणू मिसाईलच पडली.

तिने दिली लग्नपत्रिका तिची त्याच्या हाती,

भोवळ आली त्याला अन घाम त्याच्या माथी.

प्रेमाची ही अशी लक्तरेच होतात का हो सदा?

जाता जाता ती चक्क म्हणाली त्यास दादा.

अन प्रेमात ‘पडणं’ का म्हणतात हे त्याला समजलं,

जखम न दिसता ती कशी वाहते हे त्याला उमगलं.

  [‘प्रेमाचा गुलकंद’ वरून प्रेरणा घेऊन.]

3 thoughts on “मन्या आणि त्याचे प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s