शहाणपण !!!

“Two things are infinite: the universe and human stupidity; and I’m not sure about the universe.”
― Albert Einstein

“दोन गोष्टी अनंत आहेत;विश्व आणि माणसाचा मूर्खपणा;आणि यातील विश्वाविषयी मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.”

-अल्बर्ट आईन्स्टाईन,

कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो !!!

सर्वांसाठी लढलेल्या महापुरुषांची आम्ही वाटणी केलीय,

छत्रपती एकाचे,फुले दुस-याचे.

आंबेडकर अमक्याचे, तर बाजी तमक्याचे.

आम्ही फक्त आमच्या महापुरुषांना मानतो.

कारण, कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

आम्ही त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्याही साज-या करतो.

त्यांचे पराक्रम तर सर्वांनाच ठाऊक आहेत.

म्हणून आम्ही त्यांच्यापुढे हिंदी गाणी लाऊन नाचतो.

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

हॉटेलात भरमसाठ बिल देऊन वर काही टीप देतो.

भाजीवाल्याशी काही रुपयांसाठी भांडतो.

आयुष्यात आम्ही काटकसरही महत्वाची मानतो.

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

राजकारण्यांवर क्रियाशून्यतेवरून आम्ही सडकून टीका करतो.

मतदानादिवशी जोडून सुट्टी म्हणून आम्ही पिकनिकला जातो.

माझ्या एका मताने असा काय फरक पडतो?

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

फेसबुकवर मिनिटांमिनिटाला अपडेट, chatting करतो.

घरच्यांसाठी मात्र कायम offline असतो.

संवाद वगैरे out of date गोष्टी कोण करत बसतो?

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

आयुष्य संपन्न बनवण्यासाठी पैसा लागतो हे आम्ही जाणतो.

पैसा कमावण्यासाठी आम्ही धाव धाव धावतो.

जगण्यासाठी धावताना आम्ही जगायचंच विसरतो.

कारण.

कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

खरयं ना ???????

मृत्युंजय-पुस्तक परिचय !

Image          Image

मृत्युंजय या नावाला जोडूनच शिवाजी सावंत हे नाव अपरिहार्यपणे आपल्या नजरेसमोर येते. ही कादंबारी मी वाचली त्याला आत्ता अकरा-बारा वर्षे तरी सहज झाली असतील. पण आजही त्यातील प्रसंग,घटना नजरेसमोर लख्ख उभ्या राहतात. कर्णाचे तेजस्वी रूप अजून झळाळून उठते आणि आपण आपोआपच शिवाजी सावंतांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होतो. त्याच माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकाचा परिचय मी शिक्षक बांधवांना  करून दिला. त्याचीच हि ध्वनिफीत.

कृपया ऐकण्यासाठी खालील लिंक वर click करा.

https://www.box.com/s/7nd9qg8c75bx98eqj96u

खरयं, सुकाळच आहे!

English: A whelk that likes to stand out in a ...

मित्र आला.

म्हटला, भयानक दुष्काळ आहे.

मी म्हटलं, दुष्काळ आहे?

आजूबाजूला बघ डोळे उघडून,

सगळीकडे सुकाळ आहे.

रस्त्यावर गाड्यांचा सुकाळ आहे,

बारमध्ये दारूचा सुकाळ आहे,

हॉटेलात मटन चिकनचा सुकाळ आहे,

सुकाळच आहे सगळीकडे,

माणसांचाही सुकाळ,

धावणारी माणसं

धडपडणारी माणसं-पडणारी माणसं,

उत्साही माणसं-हताश माणसं,

तिकीट मागणारी माणसं,

मोर्चा, संप करणारी माणसं,

दुष्काळग्रस्तांसाठी घोषणा करणारी माणसं

आणि

त्यांच्या घोषणांचाही सुकाळ आहे.

भ्रष्टाचारानंतर बलात्कारासाठी रस्त्यावर,

candle घेऊन उतरणाऱ्या गर्दीचाही सुकाळ आहे.

प्रश्न विचारणाऱ्याचाही सुकाळच अन उत्तरेच नसणाऱ्याचाही सुकाळच !

नाहीच जाणवला तुला सुकाळ तर,

FACEBOOK वर SYSTEM विरोधी टीका कर,

Likes आणि comments चाही सुकाळ आहे.

चारा छावण्याचाही सुकाळ

Tankerचाही सुकाळ

शेत करपल्यामुळे पाण्याचाही सुकाळच,

फक्त त्यासाठीचे डोळे शोधायला तुला खेड्यात जावं लागेल,

बघ जाऊन वाहनांचाही सुकाळ आहे.,

आणि हो,

लिही त्यावर काही-बाही,

कारण,

कवी-लेखकांचाही सुकाळच आहे.

पटलं असाव कदाचित त्याला,

कारण,

t.v. व वृत्तपत्रांवरून आणि दुस-याच्या मतावरून आपली मते

बनवणा-यांचाही सुकाळच आहे !!!!!!!

मन माझे !

b_huge-moon1.jpgमन वारा

मन वारा

तिच्या आठवणीच्या पावसाच्या धारा ||

मन पाऊस

मन पाऊस

तिच्या आठवणीत रात्रभर बदलणारी कूस ||

मन रात्र

मन रात्र

तिच्या आठवणीने मोहरणारी गात्र ||

मन आठवण

मन आठवण

तिच्या न माझ्या प्रेमाची कातर साठवण ||