मला जरा तुमची मदत हवी आहे.
मी एक देश शोधतो आहे.
अनेक ठिकाणी या देशाची वर्णने मी वाचली आहेत.
अनेक कार्यक्रमातून याविषयीची चर्चा मी ऐकली आहे.
खूपच थोर त्या देशाची संस्कृती आणि समाज होता,
त्यामुळेच त्या देशी प्रत्यक्ष देव सुद्धा येऊन राहत असत.
या देशात म्हणे सर्व जन सुखा-समाधानाने राहत असत.
श्रमाला मान होता, धनाला किंमत होती.
त्याहून जास्त किंमत म्हणे माणूस आणि माणुसकीला होती.
या देशात अतिथीसाठी घरांचे व मनांचे दरवाजे सदैव उघडे असत.
घर लहान पण मनं मोठी असत.
घरात आई-वडिलांना अडगळ समजलं जात नसे.
हृदयावर कोरले जात असत एकमेकांचे ठसे.
Tecnology न्हवती तेंव्हा,न्हवता संपर्क हवा तेव्हा,
पण एक ओढ होती,दुराव्यालाही प्रेमाची जोड होती.
आणि हो एक मजेशीरच गोष्ट होती राव त्या देशाची,
तिथे म्हणे परस्त्री मातेसमान मानली जात होती.
Virgin असणं काहीच गैर नसायचं.
जरा खोटं वाटेल तुम्हाला हे सगळं,पण बरेच जन असं सांगतात तर बुवा.
ती लोकं खरं जरा Madच होती.
भोगापेक्षा त्यागाला महत्व द्यायची,
पैशापेक्षा समाधान महत्वाचं मानायची.
प्रत्येकाचं घर होतं मायेचा निवारा,
तिथे घर म्हणजे Lodge मानला जात नव्हता.
आईला Mom आणि बापाला Pop मानलं जात नव्हत.
त्यांचा म्हणे सत्य,अहिंसा,सदाचार,सहिष्णुता या सारख्या मुल्यांवर {Sorry,Moralsवर]विश्वास होता.
त्या देशात म्हणे सोन्याच धूर निघत असे,निदान त्या
सोन्याकरिता का होईना,पण मला मदत कराल का?
आणि हो एक सांगायचं राहीलच कि,—————————————————————————————————————————-त्या देशाचं नाव भारत असं होतं…….!