जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी विचार करता,
येतसे मनी फक्त चिंता,
कुठले आप्त, कोण स्वकीय,
केवळ काही क्षणांचा गुंता !
प्रेमाने अधीर ते मन,
साता जन्माच्या आणा-भाका,
सरता वर्षे, भरता आयुष्य,
उरती फक्त नियतीच्या हाका !
मित्र परिवाराचा मोहक सहवास,
निस्वार्थी मनाचे मानलेले ऋण,
सत्य अंती आयुष्याचे,
बाकी उरते केवळ शून्य !
सत्य असते म्हणे नेहमी नकारार्थी,
तरी आयुष्य नसावे फक्त पोटार्थी,
अंताच्या प्रवासा जमलेली गर्दी माझ्या,
नसावी केवळ स्वमग्न-स्वार्थी !