असे कुठे कायंय ?

ते खूप सुंदर कविता करतात,

मग आम्ही काही लिहूच नाही असे कुठे कायंय ?

त्यांच्या उपमा खूप सुरेख असतात,

मग आम्ही आमच्या शिरा ताणूच नयेत असे कुठे कायंय ?

ते अमुक अमुक वृत्तात लिहितात,

मग आमच्या मात्रा चुकूच नयेत असे कुठे कायंय ?

त्यांना तमुक तमुक छंदातील कविता उत्तम जमतात,

मग आम्ही छंद बाळगूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कविता लयीत असतात,

मग आमचा वेगळा ताल असूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेला खूप वाचक असतात,

मग आम्ही शब्दांचे याचक असूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेत भावना ओथंबून असतात,

मग आम्ही भावना मांडूच  नयेत असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेला साहित्याची खूप मोठी परंपरा आहे,

मग आम्ही परंपरा मोडूच नये असे कुठे कायंय ?

Advertisements

4 thoughts on “असे कुठे कायंय ?

  1. तोडूया परंपरेच्या बेड्या आणि ऊडवुया लक्तरे जिवघेण्या परंपरेच्या आणि घेऊया एक मोकळा श्वास मोकळेपणानं या शापित दुनियेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s