कसा मी?कसा मी?

Imageसकाळी पेपर उघडल्याबरोबर भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचून डोक्यात तिडीक जाते.बलात्काराच्या,खुनाच्या बातम्या वाचून मन सुन्न होते.समजत नाही समाजाला काय झालय ते.वैताग येतो.समाजाला दोन-चार शिव्या देऊन उठतो.नेहमीच्या कामाला लागतो.जाताना No Entry मध्ये घुसतो.पोलीस म्हणतो,३५०/- ची पावती करा. Month End ला इतकी पावती? त्यापेक्षा मिटवून घ्या म्हणतो.५० रुपयांवर व्यवहार मिटवतो.व्यवहारी म्हणून स्वताची पाठ थोपटत पुढे जातो.

————————————–@@@@@@@@@@@@@——————————————————–                                                    नीती-मुल्यांवर,हरवत चाललेल्या संवादावर तोंडभरून बोलतो.नात्यातील दरी कशी वाढतेय हे कुठेतरी वाचलेल्या उदाहरणांवरून पटवून देतो. संध्याकाळी घरी आल्यावर आईने केलेली दिवसभराची चौकशी कटकट म्हणून उडवून लावत Internet वर संवाद साधतो.

———————————@@@@@@@@@@@@@@@——————————————————–                                                    Multiplex मध्ये मी नेहमी १५/-ची Coldrinks ची बाटली २०/-रुपयांना हौसेने विकत घेतो.१८०/- च्या तिकीटात मनसोक्त सिनेमा पाहतो.संध्याकाळी घरी परतताना भाजी घेऊन,शेतक-याशी हुज्जत घालून दोन-चार रुपये तरी हमखास वाचवतो.

——————————–@@@@@@@@@@@@@@@———————————————————                                                   सिनेमातला Family Drama,देशभक्ती बघून मन माझं उचंबळून येतं.तसा मी अतिशय भावनाप्रधान आहे म्हणा ना! या भावनातिरेकाने कधी कधी डोळ्यातून एखादा थेंबही काढतो.कौटुंबिक अडचणीमध्ये मी नेहमी व्यावहारिक चातुर्याने जबाबदारी टाकत अंग चोरतो.

——————————@@@@@@@@@@@@@@@———————————————————–                                                कधी कधी मी स्वताशीच विचार करतो.कसा मी?कसा मी? माझ्यातल्या खोटारडेपणाचा मलाच तिटकारा येतो, घृणा वाटते. माझ्या मनाचा हलवा कोपरा जागा होतो, स्वताचा राग येतो,ठरवतो. आता तरी खरं वागूया, बुरखा टाकून खरोखरचं जीवन जगूया. मनाशी ठरवतो. उठतो.मस्तपैकी कडक चहा घेतो आणि पुन्हा पुर्वीसारख व्यावहारिक आयुष्य जगायला सज्ज होतो.

मृत्युंजय-पुस्तक परिचय !

Image          Image

मृत्युंजय या नावाला जोडूनच शिवाजी सावंत हे नाव अपरिहार्यपणे आपल्या नजरेसमोर येते. ही कादंबारी मी वाचली त्याला आत्ता अकरा-बारा वर्षे तरी सहज झाली असतील. पण आजही त्यातील प्रसंग,घटना नजरेसमोर लख्ख उभ्या राहतात. कर्णाचे तेजस्वी रूप अजून झळाळून उठते आणि आपण आपोआपच शिवाजी सावंतांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होतो. त्याच माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकाचा परिचय मी शिक्षक बांधवांना  करून दिला. त्याचीच हि ध्वनिफीत.

कृपया ऐकण्यासाठी खालील लिंक वर click करा.

https://www.box.com/s/7nd9qg8c75bx98eqj96u

मन माझे !

b_huge-moon1.jpgमन वारा

मन वारा

तिच्या आठवणीच्या पावसाच्या धारा ||

मन पाऊस

मन पाऊस

तिच्या आठवणीत रात्रभर बदलणारी कूस ||

मन रात्र

मन रात्र

तिच्या आठवणीने मोहरणारी गात्र ||

मन आठवण

मन आठवण

तिच्या न माझ्या प्रेमाची कातर साठवण ||